|| श्री ||

“शाळेपासूनच मला कुकिंग ची खूप आवड आहे” अस म्हणणार्‍या ग्रूप मध्ये मी कधीच नव्हते. आई जरी सर्विस करत असली तरी, माझा अभ्यास आणि माझे लाड म्हणून मला किचन मध्ये जायची वेळ फारशी कधी आली नाही. पहिल्यांदा आईपासून लांब राहीले ते बंगलोर मध्ये, नोकरीच्या निमित्ताने. तेव्हा वरण भात आणि खिचडी सोडली तर मला काहीही येत नव्हते. लन्च आणि ब्रेआकफस्टची ऑफीस मध्ये चगंळ होती. साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, डाएट काउंटर असे सगळे ऑप्षन्स होते. देवाची कृपा म्हणून मला प्रभा आंटी कडून रात्रीचा डबा मिळायचा. पण तरीही आईच्या हातचा स्वयंपाक आणि एस्पेशली पोळ्या मी खूप मिस करत होते. शनिवार-रविवार बंगलोर एक्सप्लोर करण्यात निघून गेले आणि माझ्या कुकिंगचा श्री गणेशा राहून गेला. बघता बघता माझे युस ला येण्याचे दिवस जवळ येऊ लागले. तेव्हा माझं नुकताच लग्न ठरलं होतं आणि ह्या सगळ्या गडबडीत आई कडून मी काहीच शिकून घेतलं नाही ह्याची खंत मला कायम होती.
युसला आल्यावर कुकिंग करण अनिवार्य होत. vegetarian असल्यामुळे बाहेर ऑप्षन्स खूप लिमीटेड होते आणि ते परवडण्यासारखे पण नव्हते. मी आणि माझी रूममेट, फोडणी करताना पण एकमेककींना विचारून करायचो. पण हळूहळू जमायला लागलं आणि मग वेगवेगळे पदार्थ ट्राय करण्याच सत्र सुरू झालं . कधी प्रयत्न फसले कधी यशस्वी झाले. त्या सहा महिन्यात मी बरच काही शिकले. थोडं planning आणि common sense ह्या दोन गोष्टी वापरल्या तर कुकिंग अज्जीबात अवघड नाही. नंतर मी घर बदललं, तेव्हा एक गुज्जू, एक साउथ इंडियन आणि मी अशी आमची मस्त टीम जमली.
मागच्या महिन्यात, माझ्या ग्रॅजुयेशन साठी आई बाबा इकडे आले होते. लकिली माझं joining उशिरा होतं त्यामुळे मी, आई आणि बाबा घरी एकटे होतो. मला आई कडून hands-on training  मिळत होत त्यामुळे स्वारी खुपच खुश होती. पोळ्यांपासून उकडिच्या मोदकांपर्यंत 🙂 घरगुती मसाले, चटण्या, लोणची ही आईची खासियत!. घरचं जेवण मिळत असल्यमुळे तिचे जावई बापू पण एकदम खुश होते. शिक्षण चालू होतं तेव्हा मी वेगळ्या शहरात राहत होते त्यामुळे आत्ता खर्या अर्थानी आमचा संसार सुरू झाला होता. अशा वेळी आई बाबा बरोबर होते आणि त्यांचे आशीर्वाद लाभले म्हणून मी देवाची खुप आभारी आहे.
आईने  शिकवलेले पदार्थ, तीने  दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आणि माझे बाकीचे घाट, माझ्झ्यासारख्याच नवीन लग्न झालेल्या / पोस्ट ग्रॅजुयेशन करणार्‍या / सर्विस करणार्‍या मुलींना नक्की उपयोगी पडतील म्हणून हा सगळा खटाटोप!

Advertisements